Video : धक्कादायक! तरुणीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 16:17 IST2019-01-01T16:15:03+5:302019-01-01T16:17:13+5:30

सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये तरुणी रस्त्यावरुन चालत असताना मोबाईल पाहत चालत आहे. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने तिला उडवले आणि कारच्या बोनेटवर तरुणी गेली. नंतर तरुणीसह ही कार समोर असणाऱ्या विजेच्या खांब आणि झाडावर जाऊन आदळली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Shocking The young woman was blown away by a speeding car | Video : धक्कादायक! तरुणीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले

Video : धक्कादायक! तरुणीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले

ठळक मुद्दे३० डिसेंबर रोजी दुपारी सायली राणे ही तरुणी जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरुन घरी जात होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक तरुणाला अटक केली आहे. 

मुंबई - जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका तरुणीला उडवलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये तरुणी रस्त्यावरुन चालत असताना मोबाईल पाहत चालत आहे. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने तिला उडवले आणि कारच्या बोनेटवर तरुणी गेली. नंतर तरुणीसह ही कार समोर असणाऱ्या विजेच्या खांब आणि झाडावर जाऊन आदळली आहे. या अपघातात गंभीर जखमी झाली असून ती कोमात आहे. तरुणीवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी दुपारी सायली राणे ही तरुणी जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरुन क्लासहुन घरी जात होती. त्यावेळी मागून येणाऱ्या कारने सायलीला जोरदार धडक दिली. या अपघातात सायली ८ ते १० फूट उंच उडाली आणि बोनेटवरून समोरच्या फुटपाथवर जाऊन कोसळली. गाडीचा वेग इतका होता की, त्या गाडीच्या बोनेटचा अक्षरश: चक्काचुर झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारचालक तरुणाला अटक केली आहे. 

Web Title: Shocking The young woman was blown away by a speeding car