बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीचा विवाह 9 जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:00 IST2022-04-07T16:58:53+5:302022-04-07T17:00:04+5:30
Child Marriage Case : याप्रकरणी तीच्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू-सासरे अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीचा विवाह 9 जणांविरुद्ध गुन्हा
धरणगाव जि. जळगाव : शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीच्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू-सासरे अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संबंधितांनी तिचा विवाह राहुल राजु ढालवाले (रा. शेतपुरा, चोपडा) याच्याशी लावून दिला. याप्रकरणी नवरदेव, राजू रामदास ढालवाले (सासरा), जनाबाई ढालवाले (सासू), सुनील ढालवाले (जेठ), अर्जुन ढालवाले (जेठ), (सर्व रा. शेतपुरा चोपडा ता. चोपडा) यांच्यासह मुलीचे आई, वडील, काका,काकू यांच्याविरुद्ध तक्रार दिली. यानंतर न संरक्षण अधिकारी चंद्रशेखर रवींद्र सपकाळे यांनी दिलेल्या अहवालावरुन वरील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत. जानेवारी २०२२ मध्ये हा विवाह झाला होता.