गुरु - शिष्याच्या नात्याला कलंक! दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:36 IST2019-01-28T19:34:49+5:302019-01-28T19:36:51+5:30

आरोपीस अटक : मुलीने प्राशन केले विषारी द्रव

Shocking Teacher rape on Class X student | गुरु - शिष्याच्या नात्याला कलंक! दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

गुरु - शिष्याच्या नात्याला कलंक! दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

ठळक मुद्दे तुझा अहमदपुरात सत्कार असल्याचे सांगून अहमदपूर तसेच साईनंदनवन गार्डन चाकूर येथे आणून विद्यार्थिनीवर बलात्कार केला़. याप्रकरणी शिक्षकाविरुध्द किनगाव पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अहमदपूर (जि़ लातूर) - तालुक्यातील ढाळेगाव आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक छळ करून बलात्कार केला. दरम्यान, पिडीत मुलीने विषारी द्रव प्राशन केले असून तिच्यावर अहमदपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़. याप्रकरणी शिक्षकाविरुध्द किनगाव पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांनी सांगितले की, तालुक्यातील ढाळेगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षक गणेश तुकाराम बेंबडे हा वर्षभरापासून अश्लील वर्तन करीत होता़. यासंदर्भात आई - वडिलांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली़. त्यामुळे ती एक महिना शाळेतही गेली नव्हती़. तेव्हा बेंबडे हा तिच्या घरी गेला आणि तुझा अहमदपुरात सत्कार असल्याचे सांगून अहमदपूर तसेच साईनंदनवन गार्डन चाकूर येथे आणून विद्यार्थिनीवर बलात्कार केला़. यासंदर्भात कुणालाही सांगिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली़. भीतीपोटी पीडित मुलीने २४ जानेवारी रोजी सकाळी विषारी द्रव प्राशन केले़ तिच्यावर सध्या अहमदपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पीडित मुलीच्या जबाबानुसार किनगाव पोलीस ठाण्यात कलम ३५४ (अ), ३७६ (१) (२) (आय) ५०६ भादंवि तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगाव पोलिसांनी आरोपी गणेश बेंबडे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गिते करीत आहेत.

Web Title: Shocking Teacher rape on Class X student