धक्कादायक... दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 09:24 PM2018-09-11T21:24:30+5:302018-09-11T21:25:45+5:30

Shocking ... The stabbing of a cricketer and a rickshaw puller killed by a stone | धक्कादायक... दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या 

धक्कादायक... दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या 

Next

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी अंबरनाथ- बदलापूर रोडवर दगडाने ठेचून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांना रात्री हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये राहणाऱ्या संतोष प्रविण जुबेलू या २३ वर्षाच्या रिक्षाचाकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मांडवकर याच्या भावाला संतोषने मारहाण केली होती. त्या रागातूनच संतोषची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी संतोषला अंबरनाथ-बदलापूर रोडवरील अश्विनी ढाब्यासमोरी झाडाझुडपात नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांनी संतोषच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली. संतोष जुबेलू हत्याप्रकरणी पोलिसांनी किरण मांडवकरसह त्याचा मित्र गणेश सुंके आणि सन्नी सकपाळ या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास हिल लाईन पोलीस करत आहे.

Web Title: Shocking ... The stabbing of a cricketer and a rickshaw puller killed by a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.