धक्कादायक खुलासा! आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी होती दोन महिन्यांची गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 21:20 IST2021-12-14T21:19:32+5:302021-12-14T21:20:07+5:30
Suicide Case : युवकावर पॉक्सोचा गुन्हा; मेढ्यातील घटनेला नवे वळण

धक्कादायक खुलासा! आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी होती दोन महिन्यांची गरोदर
सातारा : बिहारमधील एका अल्पवयीन मुलीने मेढ्यात केलेल्या आत्महत्येला वेगळे वळण लागले असून पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका बावीस वर्षीय युवकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंमद आझाद जासीम (वय २२, रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील एक कुटुंब मेढा येथे वास्तव्याला आले आहे. या कुटुंबातील लोक एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करत आहेत. या कुटुंबातील एका १७ वर्षांच्या मुलीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मेढा पोलिसांनी तिच्या आत्महत्येबाबत सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पीडित मुलीला महंमद या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून मेढ्यात आणले होते. ती अल्पवयीन असतानाही तिच्याशी त्याने लग्न केले. लग्नानंतर तिच्याशी नेहमी तो वाद घालत होता. या वादातूनच तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी महमंद जासीम याच्यावर अत्याचार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.