Shocking! The policeman's son came with a pistol and picked up the girl from the house | धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला

धक्कादायक! पोलिसाचा मुलगा पिस्तूल दाखवत आला, तरुणीला घरातून उचलून घेऊन गेला

जयपूर - जयपूरमधील किशनगंज हौसिंग बोर्डजवळ एका गुंडाने घरात घुसून तरुणीचे फिल्मीस्टाइलमध्ये अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News) गंभीर बाब म्हणजे आरोपी तरुण हा राजस्थान पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या पोलिसाचा मुलगा आहे. (Rajasthan) आरोपी तरुण तरुणीच्या घरी जीप घेऊन आला. त्यानंतर पिस्तूल दाखवत घरात घुसला आणि तरुणीला ओढत बाहेर आणू लागला. त्यावेळी पीडितेच्या आई-वडलांनी विरोध केला असता या तरुणाने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर पीडितेला जीपमध्ये घालून पसार झाला. (The policeman's son came with a pistol and picked up the girl from the house)

किशनगड येथे तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलाला सदर तरुणीचे अपहरण करण्यापासून कुणी रोखू शकले नाही. त्याने घराच्या बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणीच्या आई, वडिलांना रुग्णालयात दाखल केले. 

याबाबत माहिती देताना शेजाऱ्यांनी सांगितले की, आरडाओरडा ऐकून आम्ही घटनास्थळावर धावत पळत आलो. मात्र गुंडाच्या हातात पिस्तूल पाहिल्याने आम्हाला भीती वाटली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आरोपीला अटक करून तरुणीची मुक्तता करण्यासाठी पोलिसांनी पथक स्थापन केले आहे. 

दरम्यान पीडितेच्या आईने आरोप केला की, हेड कॉन्स्टेबलचा मुलगा सुनील याच्याविरोधात तक्रार घेऊन आम्ही अनेकदा पोलीस ठाण्यात गेलो. मात्र  तिथे आमचे कुणी ऐकून घेतले नाही. आता अपहृत तरुणीच्या आईला आपल्या मुलीच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. तिच्या आई-वडिलांनी मुलीची लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. 
 

Web Title: Shocking! The policeman's son came with a pistol and picked up the girl from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.