धक्कादायक! लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 17:14 IST2019-09-09T17:13:21+5:302019-09-09T17:14:54+5:30

या गुन्ह्याच्या तपासाअंती आता शिक्षिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking! Police has taken detain teacher for sexual assault | धक्कादायक! लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी केली अटक

धक्कादायक! लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे शाळेला सुट्टी असल्याने आणि संबंधित शिक्षिका गरोदर असल्याने चौकशी लांबली होती. या शिक्षेकेला अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबई - दोन शाळकरी मुलांनी त्यांच्याच वर्ग मित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाअंती आता शिक्षिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपर खैरणे सेक्टर ४ येथील शाळेतील सहावीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला होता. त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. दोन दिवसांनी हा प्रकार पालकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने आणि संबंधित शिक्षिका गरोदर असल्याने चौकशी लांबली होती. अखेर या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सोमवारी सकाळी शाळेतल्या एका शिक्षिकेला आणि एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अत्याचार केले होते, त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी शिक्षिकेचाही त्यात सहभाग असल्याचे सांगितले. यानुसार या शिक्षेकेला अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

   

Web Title: Shocking! Police has taken detain teacher for sexual assault