धक्कादायक! पोलिसांनी केली महिलेला पट्ट्याने मारहाण; ५ पोलिसांचे निलंबन      

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 16:00 IST2019-05-28T15:58:14+5:302019-05-28T16:00:59+5:30

या प्रकरणी ५ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking Police brutally assaulted woman; suspension of five police in haryana | धक्कादायक! पोलिसांनी केली महिलेला पट्ट्याने मारहाण; ५ पोलिसांचे निलंबन      

धक्कादायक! पोलिसांनी केली महिलेला पट्ट्याने मारहाण; ५ पोलिसांचे निलंबन      

ठळक मुद्देपोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर हरियाणा पोलिसांवर टीकेची झोड उडाली आहे.

फरिदाबाद - पाच पोलिसांनी हरियाणा येथे एका महिलेला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे आणि या धक्कादायक घटनेला वाच्या फुटली. पोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी ५ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी यातील आरोपी २ हेड कॉन्स्टेबल आणि ३ विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी पीडित महिलेला तिचा मोबाईल क्रमांक विचारत आहे आणि इतर पोलीस कर्मचारी तिला पट्ट्याने मारहाण करताना दिसून येत आहे. संबंधित व्हिडीओ हरियाणातील फरीदाबाद पोलिसांचा आहे. व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर हरियाणा पोलिसांवर टीकेची झोड उडाली आहे.

Web Title: Shocking Police brutally assaulted woman; suspension of five police in haryana