हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:30 IST2021-12-06T19:29:05+5:302021-12-06T19:30:01+5:30
Triple Murder Case : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ
कोलकाता - संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एकाला अटक केली आहे. तर आणखी एक आरोपी फरार आहे.
पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपन घोष असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत घोष असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात हे हत्याकांड घडलं आहे. हुगळी जिल्ह्यातील सिंगूरनंतर आता चंडीतला येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
चंडीतला येथील नैती भागात संजय घोष हे आपल्या पत्नी व मुलीसह राहत होते. मालमत्तेच्या वादातून आज त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर असत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस, स्थानिक लोक आणि अटक आरोपींची चौकशी करत आहेत.