धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:25 PM2020-05-05T19:25:34+5:302020-05-05T19:31:40+5:30

लॉकडाउन ३ मध्ये सरकारकडून लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे.

Shocking! Murder of a barber for refusing to cut his hair in a lockdown pda | धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

Next
ठळक मुद्देबिहारच्या बांका जिल्ह्यात केस न कापल्याने आणि दाढी न केल्याने न्हाव्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. अमरपूर पोलिस स्टेशन परिसरातील मैनमा गावात दिनेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला.

कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा देशभरात केली जाते. लॉकडाउन ३ मध्ये सरकारकडून लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली  आहे. परंतु सलून - स्पावर पूर्णपणे बंदी आहे. दरम्यान, बिहारच्या बांका जिल्ह्यात केस न कापल्याने आणि दाढी न केल्याने न्हाव्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे.

अमरपूर पोलिस स्टेशन परिसरातील मैनमा गावात दिनेश ठाकूर नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आला. सध्या मृताची पत्नी मुसा देवी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना त्याच गावातली आहे जिथे पूर्वी 23 जणांचा कोरोना टेस्टसाठी नमुने घेण्यात आले होते.

Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या पोलिसाला अटक 


मृत दिनेश ठाकूरची पत्नी मुसा देवी यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार लॉकडाऊनदरम्यान गावकरी त्याच्यावर केस व दाढी कापण्यासाठी दबाव आणत होते. तिने सांगितले की, शनिवारी ठाकूर यांना गावातील बिपिन दास नावाच्या व्यक्तीने बोलविले. दुसर्‍या दिवशी त्याचा मृतदेह गावच्या तलावामध्ये दोन बंदुकीच्या गोळीच्या खुणांसह सापडला. अमरपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी कुमार सनी यांनी सांगितले की, मुख्य आरोपी बिपिन दास बेपत्ता आहे. आम्ही आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. ते म्हणाले की, या घटनेची अधिक माहिती गोळा करण्यासाठी ग्रामस्थांशी चौकशी केली जात आहे.


मार्च महिन्यात बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संशय असलेल्या एका तरूणाची निर्घृण हत्या केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले. ही घटना जिल्ह्यातील रुन्निसैदपूर पोलिस स्टेशन परिसरातील मधौल गावची आहे. येथे संशयितांनी बबलू नावाच्या युवकाला आपल्या सहकाऱ्यांसह गावातून मारहाण करून हत्या केली.
 

Web Title: Shocking! Murder of a barber for refusing to cut his hair in a lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.