कुशीनगर - उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील पतीच्या चारित्र्यामुळे कंटाळलेल्या पत्नीने विळीने पतीचे गुप्तांग कापले. पतीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमी पतीवर उपचार सुरु असून आरोपी पत्नी फरार आहे. ही घटना कुबेरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायडीह गावात घडली आहे. पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप तक्रार नोंद करण्यात आलेली नाही.जिल्ह्यातील सरायडीह गावात राहणारे गुलाब चौहान हे एका वीटभट्टीवर ट्रॅक्टर चालकाचं काम करतात. जवळपास आठ वर्षांपूर्वी वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या झारखंडच्या महिलेसोबत त्याने लग्न केले. दोघांना तीन मुलं आहेत. सोमवारी रात्री गुलाब झोपलेला असताना मध्यरात्री पत्नीने विळीने गुलाबाचे गुप्तांग कापले आणि पत्नी फरार झाली. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिने हे पाऊल उचलले. आरडाओरडा ऐकून नातेवाईक गुलाबकडे धावत आले. त्यावेळी गुलाबाला गोरखपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुलाबाचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने गुलाबासोबत पत्नीचे वाद होतं असत.
धक्कादायक! रात्री पती झोपलेला अन् पत्नीने कापले त्याचे गुप्तांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 21:56 IST
पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप तक्रार नोंद करण्यात आलेली नाही.
धक्कादायक! रात्री पती झोपलेला अन् पत्नीने कापले त्याचे गुप्तांग
ठळक मुद्देजखमी पतीवर उपचार सुरु असून आरोपी पत्नी फरार आहे. ही घटना कुबेरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायडीह गावात घडली आहे.