Shocking! He had come with petrol to burn his girlfriend's mother and sister! | धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता!

धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता!

ठळक मुद्देया प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीस पालघर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले गेले.

पालघर - लग्न मोडल्याचा राग मनात खदखदत असल्याने सूडाच्या भावनेने पेटलेल्या एका तरुणाने राजस्थानहून पालघर गाठले. मुलीच्या आईला आणि तिच्या लहान बहिणीला जाळण्याचा डाव पालघर पोलिसांनी वेळीच हाणून पाडित रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक केली.

पालघरमधील राहणाऱ्या एका मुलीचे राजस्थान-अजमेर येथील भैरोसिंग राघूवीरसिंग राठोड (28)  तरुणाबरोबर लग्न जमणार असताना हा आरोपी काही काम धंदा करत नसल्याचे त्या मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी या लग्नाला नकार दिला. या मुलीने त्यानंतर दुसरीकडे लग्न केले. हाच राग मनात ठेवून या आरोपीने तिला फेसबुकवरून बदनामी करायला सुरुवात केली. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. मात्र, काही दिवसांपासून आरोपीने मुलीच्या आईला फोनवरून त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.

मुलीच्या आईने ही बाब पालघर पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आधी पोलीस अजमेर येथे त्याला शोधायला गेली. मात्र, गुरुवारी त्याचे लोकेशन पालघर येथे दाखवत असल्याने निरीक्षक दशरथ पाटील व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला लोकेशननुसार शोधायला सुरुवात केली. मात्र, तो फोन बंद ठेवत असल्याने पोलिसांची अडचण वाढली होती. अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास आरोपीस पालघर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले गेले.पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्या बॅगेत असलेल्या पेट्रोलने तो मुलीच्या आईला व मुलीच्या लहान बहिणीला जाळण्याचा प्रयत्न करणार होता अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! He had come with petrol to burn his girlfriend's mother and sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.