Shocking! Groom committed suicide before marriage in hall | धक्कादायक! बोहल्यावर चढण्याआधी नवऱ्याने केली आत्महत्या

धक्कादायक! बोहल्यावर चढण्याआधी नवऱ्याने केली आत्महत्या

ठळक मुद्देएन. एस. संदीप असं मृत तरुणाचं नाव आहे. संदीपने पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृश्य समोर होते. या घटनेमुळे नववधू आणि तिच्या वडीलांना मोठा धक्का बसला असून दोघांनाही उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील एका तरुणाने लग्नालाअर्धा तास बाकी असताना लग्न मंडपामध्येच बोहल्यावर चढण्याआधी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नववधू आणि तिच्या वडीलांना मोठा धक्का बसला असून दोघांनाही उपाचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मेधचाल जिल्ह्यामधील कोम्पल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. एन. एस. संदीप असं मृत तरुणाचं नाव आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार संदीप हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता असून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधी त्याने आपल्या जीवनाचा प्रवास संपविला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याचं लग्न ठरलं होतं. चांगली नोकरी करणारा नवरा मुलगा मिळाल्याने मुलीकडील मंडळी आनंदी होती. लग्नासाठी दोन्ही कुटुंबांने जोरदार तयारी केली होती. वर आणि वधू यांच्याकडील अनेक पाहुणे लग्नसोहळ्यासाठी मंडपामध्ये उपस्थित होती.

नवरी मुलगी वधूपक्षासाठी देण्यात आलेल्या रुममध्ये आणि नवरा मुलगा वरपक्षाच्या रुममध्ये लग्नासाठी तयार होत होते. लग्न मुहूर्ताच्या काही वेळआधी मुलगी लग्न मंडपामध्ये येऊन उभी राहिली. त्यावेळी सर्व नातेवाईक संदीपची वाट पाहत होते. मुहूर्त जवळ आला तरी संदीप लग्न मंडपात आला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी संदीपच्या रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र, काहीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी संदीपने पंख्याला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृश्य समोर होते. संदीपला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आलं. संदीपने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

Web Title: Shocking! Groom committed suicide before marriage in hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.