धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:13 IST2025-07-02T13:13:25+5:302025-07-02T13:13:46+5:30
एका प्रेयसीने वाद झाल्यानंतर आपल्या प्रियकरावर ब्लेडने हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर वार केला.

धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खलीलाबाद कोतवाली परिसरातील मुसहरा गावात एका प्रेयसीने वाद झाल्यानंतर आपल्या प्रियकरावर ब्लेडने हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर वार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गर्लफ्रेंडच्याच घरात घडलं भीषण कृत्य!
समोर आलेल्या माहितीनुसार, खलीलाबाद कोतवाली हद्दीतील जंगल कला गावातील १९ वर्षीय विकास निषाद सोमवारी (३० जून) आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शेजारच्या मुसहरा गावात गेला होता. दोघांमध्ये गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गर्लफ्रेंडने विकासला फोन करून घरी बोलावले होते. रात्री दोघे सुमारे ६ तास एकत्र होते.
दरम्यान, दोघांमध्ये काही तरी वाद झाला आणि प्रेयसीने अचानक विकासच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला. त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला आणि तो प्रचंड वेदनेने विव्हळत होता.
रक्तस्राव थांबवण्यासाठी ५ तास प्रयत्न!
विकास शर्थीचे प्रयत्न करून रक्ताच्या थारोळ्यातून कसेबसे घर गाठू शकला. त्याने घरी पोहोचल्यावर सुमारे ५ तास रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू करण्यात आले.
विकासच्या आईचा आरोप
विकासच्या आईने सांगितले की, “ती मुलगीच माझ्या मुलाच्या मागे लागली आहे. सोमवारी तिनेच फोन करून विकासला घरी बोलावलं आणि सकाळी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केला. त्यामुळे माझ्या मुलाची अवस्था बिकट झाली.”
खूप रक्त वाया गेल्याने विकास बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांनी त्याला रक्त चढवलं आणि नंतरच त्याची शुद्ध परत आली.
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रतीक्षा
खलीलाबाद कोतवाली पोलिसांनी सांगितले की, अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.