घणसोलीतील धक्कादायक प्रकार; पाण्याच्या टाकीत आढळले बिन शिराचे धड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:10 IST2019-06-04T20:08:37+5:302019-06-04T20:10:40+5:30
सातत्याने घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घणसोलीतील धक्कादायक प्रकार; पाण्याच्या टाकीत आढळले बिन शिराचे धड
ठळक मुद्देअज्ञात व्यक्तीकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे.हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे शीर कापून केवळ धड पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेले आहे.
नवी मुंबई - घणसोली येथील वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीत बेवारस मृतदेह आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे शीर कापून केवळ धड पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेले आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न रबाळे पोलीस करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी घणसोलीमध्येच अज्ञात महिलेचे शीर आढळून आले होते. सातत्याने घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.