धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर माजी आमदाराने केला बलात्कार; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:10 PM2020-07-30T12:10:18+5:302020-07-30T12:18:21+5:30

१२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुरुगेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Shocking! Former MLA rapes minor girl; Accused arrested in kanyakumari | धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर माजी आमदाराने केला बलात्कार; आरोपीला अटक

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर माजी आमदाराने केला बलात्कार; आरोपीला अटक

Next

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल १५ लाखांवर पोहचला आहे.तर ३५,००३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कन्याकुमारीतील नागरकोईलमधील माजी आमदाराने एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली होती. या पोलीस पथकांना अखेर यश आले आहे.  ए. मुरुगेशन (वय ५३) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

१२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुरुगेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. तिरुनेलवेली जिल्ह्यातील उवारी आणि थिसायनविलाई गावांमध्ये तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी पोलिसांच्या पाच विशेष पथकांनी शोधमोहीम सुरू केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुरुगेशनला सोमवारी एआयएडीएमकेमधून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात त्याच्यासह इतर चार जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनामुळे देशभराता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच जिल्हाबंदी देखील करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. मात्र असं असताना आरोपी दूसऱ्या जिल्ह्यात गेलाच कसा असा प्रश्न पडला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत.

Web Title: Shocking! Former MLA rapes minor girl; Accused arrested in kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.