शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

धक्कादायक! 'व्हाट्स अ‍ॅप' ग्रुप'मधून काढून टाकल्याने मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:13 PM

६० वर्षांच्या नातेवाइकांसह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देयाप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : ' व्हाट्स अ‍ॅप ' हा आता लोकांच्या जणू जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे़ एकमेकांचे नातेवाईक असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्यांमध्ये मारामारी झाली. त्यावरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मगरपट्टा सिटीमध्ये २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे.याप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.त्यावरून हडपसर पोलिसांनी तिघाविरुद्ध विनयभंग करणे, दुखापत करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी व आरोपी हे नातेवाईक आहेत़ त्यांच्या नातेवाइकांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. त्यामधून एकाला काढून टाकायला लावले़ याचा जाब विचारण्यासाठी ही महिला, तिचे पती, सासू-सासरे असे सर्व मिळून शनिवारी रात्री मगरपट्टा सिटी येथील आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा वादावादी झाली. तेव्हा आरोपी व त्यांच्या नातेवाइकांनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिली. फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हडपसर पोलिसांनी ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकासह तरुणाला ताब्यात घेतले आहे.व्हॉट्सअ‍ॅप गु्रपमध्ये एखाद्याला काढून टाकणे अथवा घेणे हे आता लोकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ लागला आहे.किरकोळ वाटणाऱ्या अशा घटना किती गंभीर होऊ शकतात, हेच यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून एखाद्याला काढून टाकताना संबंधित दुखावला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपWomenमहिलाMolestationविनयभंगPoliceपोलिस