लज्जास्पद! वृद्धाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण अन् ती राहिली गरोदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 16:39 IST2020-02-25T16:31:58+5:302020-02-25T16:39:47+5:30
वॉचमनला केली पोलिसांनी अटक

लज्जास्पद! वृद्धाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण अन् ती राहिली गरोदर
डोंबिवली - खाऊ आणि पैशांचे आमिष दाखवत एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार करुन तिला गरोदर करणाऱ्या ६३ वर्षीय वॉचमनला रामनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली.
नात्याला काळिमा! भावाने बहिणीचे केले १०० वेळा लैंगिक शोषण अन्...
भाजप आमदारासह ७ जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा
रामनगर पोलीस ठाण्याच्या हददीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह रहाते. याच इमारतीमध्ये ६३ वर्षीय आरोपी वॉचमनचे काम करतो. पीडित मुलीला खाऊ आणि पैशांचे प्रलोभन आरोपीने दाखवले. त्यानंतर, त्याच सोसायटीच्या गच्चीवरील स्टोअर रुममध्ये पीडितेला नेऊन तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. सदरचा प्रकार सन २०१७ च्या उन्हाळयाच्या सुट्टीपासून ते फेब्रुवारी २०२० पर्यंत सुरु होता. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा दाखल करत आरोपीला शनिवारी अटक केली.