शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पतीच्या प्रेयसीसह चिमुकल्याला जिवंत जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 22:12 IST

प्रकरणी सीमासोबत तिचा पती सुदीप व त्याची आई सुलेखा यांना देखील अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसीमा तिची सासू सुलेखासोबत दिपाला धमकविण्यासाठी तिच्या घरी गेली होती. घराला लागलेल्या आगीमुळे दीपा, तिचा 6 वर्षांचा मुलगा यांचा गुदमरून, होरपळून मृत्यू झाला.

राजस्थान - विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पत्नीने तिच्या पतीच्या प्रेयसीच्या घराला आग लावून तिला आणि तिच्या ६ वर्षीय मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. सीमा गुप्ता असं आरोपी महिलेचे नाव असून ती डॉक्टर आहे. याप्रकरणी सीमासोबत तिचा पती सुदीप व त्याची आई सुलेखा यांना देखील अटक करण्यात आली आहे.राजस्थान येथील भरतपूर परिसरात डॉ. सीमा गुप्ता यांचा पती सुदीप हा देखील डॉक्टरच आहे. सीमा यांचे काली बागची येथे क्लिनीक असून त्या क्लिनिकवर दीपा ही रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. तिथेच दिपा व सुदीप यांचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सीमाला कुणकुण लागल्यानंतर तिने दिपाला कामावरुन कमी केले. मात्र, त्यानंतरही सुदीप आणि दिपाचे छुपे प्रेमसंबंध सुरुच होते. सुदीपने दिपाला एक घर देखील घेऊन दिले होते. तिथे दिपा आणि तिच्या सहा वर्षांचा मुलगा राहत असे. सीमा तिची सासू सुलेखासोबत दिपाला धमकविण्यासाठी तिच्या घरी गेली होती. तेथे त्या दोघींचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर सीमाने स्वत:सोबत आणलेले रॉकेल दीपाच्या घरात ओतले व घराला आग लावली. त्यानंतर सीमाने सासूसोबत तेथून पळ काढला. घराबाहेर पडल्यानंतर तिने दीपाच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या बाहेरून लावल्या. काही वेळातच आग भडकली व संपूर्ण घरात पसरली. घराला लागलेल्या आगीमुळे दीपा, तिचा 6 वर्षांचा मुलगा यांचा गुदमरून, होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी डॉ.सुदीप, त्याची पत्नी डॉ. सीमा आणि आई सुलेखा यांना बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस