धक्कादायक! विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पतीच्या प्रेयसीसह चिमुकल्याला जिवंत जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 22:12 IST2019-11-08T22:11:09+5:302019-11-08T22:12:32+5:30

प्रकरणी सीमासोबत तिचा पती सुदीप व त्याची आई सुलेखा यांना देखील अटक करण्यात आली आहे.

Shocking! Due to Extra marital affairs spouse has burned her husband's girlfriend and 6 years old boy | धक्कादायक! विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पतीच्या प्रेयसीसह चिमुकल्याला जिवंत जाळले 

धक्कादायक! विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पतीच्या प्रेयसीसह चिमुकल्याला जिवंत जाळले 

ठळक मुद्देसीमा तिची सासू सुलेखासोबत दिपाला धमकविण्यासाठी तिच्या घरी गेली होती. घराला लागलेल्या आगीमुळे दीपा, तिचा 6 वर्षांचा मुलगा यांचा गुदमरून, होरपळून मृत्यू झाला.

राजस्थान - विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे पत्नीने तिच्या पतीच्या प्रेयसीच्या घराला आग लावून तिला आणि तिच्या ६ वर्षीय मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. सीमा गुप्ता असं आरोपी महिलेचे नाव असून ती डॉक्टर आहे. याप्रकरणी सीमासोबत तिचा पती सुदीप व त्याची आई सुलेखा यांना देखील अटक करण्यात आली आहे.

राजस्थान येथील भरतपूर परिसरात डॉ. सीमा गुप्ता यांचा पती सुदीप हा देखील डॉक्टरच आहे. सीमा यांचे काली बागची येथे क्लिनीक असून त्या क्लिनिकवर दीपा ही रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. तिथेच दिपा व सुदीप यांचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सीमाला कुणकुण लागल्यानंतर तिने दिपाला कामावरुन कमी केले. मात्र, त्यानंतरही सुदीप आणि दिपाचे छुपे प्रेमसंबंध सुरुच होते. सुदीपने दिपाला एक घर देखील घेऊन दिले होते. तिथे दिपा आणि तिच्या सहा वर्षांचा मुलगा राहत असे. 

सीमा तिची सासू सुलेखासोबत दिपाला धमकविण्यासाठी तिच्या घरी गेली होती. तेथे त्या दोघींचे जोरदार भांडण झाले. त्यानंतर सीमाने स्वत:सोबत आणलेले रॉकेल दीपाच्या घरात ओतले व घराला आग लावली. त्यानंतर सीमाने सासूसोबत तेथून पळ काढला. घराबाहेर पडल्यानंतर तिने दीपाच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या बाहेरून लावल्या. काही वेळातच आग भडकली व संपूर्ण घरात पसरली. घराला लागलेल्या आगीमुळे दीपा, तिचा 6 वर्षांचा मुलगा यांचा गुदमरून, होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी डॉ.सुदीप, त्याची पत्नी डॉ. सीमा आणि आई सुलेखा यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Shocking! Due to Extra marital affairs spouse has burned her husband's girlfriend and 6 years old boy