शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 6:01 PM

चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते.

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते. मात्र, सुत्रांनुसार सीबीआय, ईडीला चिदंबरम कुठे लपलेत या ठिकाणाची माहिती असल्याचे समोर आले आहे. 

तपास संस्थांमधील सुत्रांच्या हवाल्याने एका हिंदी वृत्तसंस्थेने (अमर उजाला) ही माहिती दिली आहे. सीबीआय, ईडीला चिदंबरम यांच्या लपण्याच्या जागेचा ठावठिकाणा माहिती होता. मात्र, जाणूनबुजून ते जोरबाग येथील घरी शोधायला गेल्याचे सांगण्यात आले. 

एका गुप्तचर संस्थेने चिदंबरम यांच्या ठावठिकाण्य़ाबद्दल अचूक माहिती दिली होती. चिदंबरम नॉर्थ अव्हेन्यूयेथील एका घरामध्ये लपले होते. तपास संस्थांनी जर मनावर घेतले असते तर ते चिदंबरम यांना ताब्यात घेऊ शकले असते. तसेच संध्याकाळपर्यंत त्यांचा फोनही सुरू होता आणि या प्रकरणातील सर्व आदेश वरिष्ठांकडून येत होते, असा गौप्यस्फोट या सूत्रांनी केला आहे. 

अर्ध्या रस्त्यात बदलली कारसुत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात हजर होते. तेथून निघाल्यानंतर ते जोरबाग येथील घरी गेले नाहीत. त्यांना सीबीआय, ईडी अटक करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून निघाल्यानंतर रस्त्यातच गाडी बदलली होती. आणि जवळपास 8 वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस