धक्कादायक! कानातल्या रिंग न दिल्यानं 4 वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 23:20 IST2018-11-15T23:19:39+5:302018-11-15T23:20:35+5:30

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर वसाहतीमध्ये रिजवाना शेख राहते. याच परिसरात चार वर्षाची पीडित मुलगी

Shocking The 4-year-old girl gave inhuman injuries without giving ear to the ring | धक्कादायक! कानातल्या रिंग न दिल्यानं 4 वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण

धक्कादायक! कानातल्या रिंग न दिल्यानं 4 वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण

मुंबई - मानखुर्दमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवला अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रिझवाना शेख (३५) या महिलेला अटक केली आहे. आपल्या कानातील रिंग देण्यास या चिमुकलीने नकार दिला होता. त्यामुळे रिझवाने हिने या चिमुरडीस मारहाण केली. 

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर वसाहतीमध्ये रिजवाना शेख राहते. याच परिसरात चार वर्षाची पीडित मुलगी देखील राहत असून बुधवारी सायंकाळी ती इमारतीच्या लिफ्टमधून घरी जात होती. लिफ्टमध्ये मुलीला एकटी पाहून रिझवाना हिने तिच्या कानातले हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करताच रिझवाना हिने लिफ्टचा दरवाजा बंद करुन तिला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. मुलीची आरडाओरड ऐकून येथील रहिवाशांनी रिझवानाच्या तावडीतून या चिमुरडीचा सुटका केली. मात्र, एखाद्या वेडसर बाईप्रमाणे रिझवाना या चिमुलीच्या अंगावर बसून तिला मारहाण करत होती. लिफ्टमधील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला होता. याबाबत वसाहतीतील रहिवाशांनी ट्रॉम्बे पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Shocking The 4-year-old girl gave inhuman injuries without giving ear to the ring