शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

२५ वेळा चाकूने वार करून हत्या, वर्षानुवर्षे झेलत होती लैंगिक शोषणाचा त्रास

By पूनम अपराज | Updated: October 17, 2020 21:34 IST

Murder : ही घटना कैंट पोलीस स्टेशन परिसरातील वरच्या बाजारात घडलेली आहे. ही महिला अशोकनगर जिल्ह्यातील अचलगड येथील असून तिचा नवरा याच जिल्ह्यात शिक्षिक होता.

ठळक मुद्देशर्माच्या या दुष्कृत्यापासून स्वत: चा बचाव करीत महिलेने निलंबित नेत्याला चक्कूने 25 वेळा वार करून हत्या केली. एवढेच नाही तर महिलेने दुपारी अडीचच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती दिली.

मध्य प्रदेशच्या गुनात एका महिलेने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी अशोकनगर काँग्रेसचे नेते ब्रजभूषण शर्मा याची हत्या केली. त्या महिलेच्या मनात इतका राग होता की, तिने काँग्रेस पक्षातून हद्दपार केलेल्या नेत्याच्या शरीरावर 25 वेळा वार केले. पक्षाने यापूर्वीच नेत्याला काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे.ही घटना कैंट पोलीस स्टेशन परिसरातील वरच्या बाजारात घडलेली आहे. ही महिला अशोकनगर जिल्ह्यातील अचलगड येथील असून तिचा नवरा याच जिल्ह्यात शिक्षिक होता. खरं तर, शर्मा एका रात्री 11 वाजता महिलेच्या घरी पोहोचला आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. शर्माच्या या दुष्कृत्यापासून स्वत: चा बचाव करीत महिलेने निलंबित नेत्याला चक्कूने 25 वेळा वार करून हत्या केली. एवढेच नाही तर महिलेने दुपारी अडीचच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि महिलेला अटक केली. 

हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेलाही न्यायालयात हजर केले असता मंगळवारी कोर्टाने महिलेला तुरूंगात रवानगी केली आहे. बृजभूषण शर्मा महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा तिचा नवरा तिथे नव्हता आणि गुन्हा केल्यावर महिलेने पोलिसांना आणि तिच्या पतीला दोघांना याबाबत माहिती दिली.व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शर्माने महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओही बनविला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे अस्वस्थ होऊन महिलेने शर्माच्या शरीरावर अनेक वार केले आणि शर्माच्या पाठीवर अनेक खुणा दिसल्या. पोलिसांनी सांगितले की, ही महिला आणि शर्मा हे दोघेही अचलगड येथील रहिवासी आहेत आणि दोघांचे पूर्वीचे अवैध विवाहबाह्य संबंध होते आणि नंतर ते खुनात बदलले होते.शर्मा जेव्हा त्या महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा तिचा नवरा तिथे नव्हता, पण त्याला दोन मुले होती आणि दोघे देखील झोपले होते. आवाज आल्यावर महिलेची सहा वर्षाची मुलगी जागी झाली. येथे मृताची पत्नी अपर्णा शर्मा यांनी स्वतः महिलेवर आरोप केले आहेत. ती म्हणते की, त्या बाईने प्रथम माझ्या पतीला तिच्या प्रेमात अडकविले आणि दागिने लुटले. त्यानंतर आरोपी महिलेने प्रियकरासह माझ्या पतीला ठार केले, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक