"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:58 IST2025-10-08T11:56:44+5:302025-10-08T11:58:06+5:30
खुशनुमा गेल्या सात महिन्यांत पाच वेळा तिचा बॉयफ्रेंड साबीरसोबत घरातून पळून गेली होती.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना येथे झालेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. पत्नी बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यावर दु:खी झालेल्या पतीने आपल्या चार मुलांसह यमुना नदीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आता त्याची पत्नी खुशनुमा आणि तिचा बॉयफ्रेंड साबीर यांना अटक केली असून जेलमध्ये पाठवलं आहे.
मूळचा बिहारचा रहिवासी असलेला ३८ वर्षीय सलमान गेली अनेक वर्षे शामलीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. त्याची पत्नी खुशनुमा गेल्या सात महिन्यांत पाच वेळा तिचा बॉयफ्रेंड साबीरसोबत घरातून पळून गेली होती. प्रत्येक वेळी सलमानने तिची खूप समजूत काढून तिला घरी परत आणलं, पण यावेळी तो खूपच खचला.
घटनेच्या दिवशी, ३ ऑक्टोबर रोजी, सलमानने त्याच्या बहिणीला एक व्हिडीओ मेसेज पाठवला. त्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी त्याची पत्नीच जबाबदार असल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्यानंतर त्याने चारही मुलांसह नदीत उडी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
कैराना पोलिसांनी खुशनुमा आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करून न्यायालयात हजर केलं, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. चौकशीदरम्यान, खुशनुमाने आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं परंतु सलमानच्या मृत्यूबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचं म्हटलं. साबिरने सुरुवातीला त्यांचं नातं नाकारलं, परंतु पुराव्यामुळे त्याला कबूल करावं लागलं.
५ ऑक्टोबर रोजी सलमान आणि त्याची मोठी मुलगी मेहक यांचे मृतदेह सापडले. उर्वरित तीन मुलांचा शोध अजूनही सुरू आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं की खुशनुमा आणि साबीर यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते, ज्यामुळे सलमानला मानसिक त्रास झाला होता. त्यातून त्याने मुलांसह नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.