शरमेची बाब! पोलीस निरीक्षकाकडून महिला काॅन्स्टेबलचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:24 IST2021-06-04T17:24:10+5:302021-06-04T17:24:38+5:30
Rape case : वाशिम पोलिसांत गुन्हा दाखल;आरोपी नांदेड जिल्ह्यात कार्यरत

शरमेची बाब! पोलीस निरीक्षकाकडून महिला काॅन्स्टेबलचा बलात्कार
वाशिम : अर्धापूर (जि.नांदेड) येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत विश्वकांत गुट्टे याने वाशिम येथे ३० मे रोजी एका महिला काॅन्स्टेबलचा बलात्कार केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी गुट्टेवर गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला काॅन्स्टेबलने दाखल केलेल्या तक्रारी नमूद केले आहे की, आरोपी विश्वकांत गुट्टे हा २००७ मध्ये मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. त्यादरम्यान त्याच्याशी ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत ३० मे २०२१ रोजी आरोपीने वाशिममध्ये माझ्या घरी येऊन जबरदस्ती करत बलात्कार केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून आरोपी विश्वकांत गुट्टे याच्यावर शहर पोलिसांत कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांनी सांगितले.
संजय गांधी उद्यानात हरणांच्या गवतावर-झाडाझुडपांवर विषारी औषधी फवारणाऱ्यास अटकhttps://t.co/heMhwRkElW
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ; दोन दिवस संपर्क नाहीhttps://t.co/vACRBtAmkl
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021