लज्जास्पद! डान्सरवर सामूहिक बलात्कार, आरोपीने केला व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 21:29 IST2022-03-01T21:28:56+5:302022-03-01T21:29:37+5:30
Gangrape Case : महिलेच्या आरोपानुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि व्हिडिओ बनवण्यात आला, आरोपींचा शोध सुरू आहे.

लज्जास्पद! डान्सरवर सामूहिक बलात्कार, आरोपीने केला व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका डान्सरला कोल्ड ड्रिंक देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन जण आणि आठ अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ज्यांच्या विरोधात एफआयआर लिहिला आहे, त्यामध्ये नर्तक देवा सरदार, मोहित आणि शोभित यांच्या ओळखीच्या तीन जणांचा समावेश आहे, तर पार्टीत सहभागी असलेले आठ जण अज्ञात आहेत.
हे प्रकरण 6 फेब्रुवारीचे असले तरी डान्सरने आता एफआयआर दाखल केला आहे. डान्सर म्हणते की, मी माझ्या पतीपासून वेगळी राहते, त्यामुळे मी मुलांना वाढवण्यासाठी डान्स करते, देवा सरदार नावाचा तरुण मला डान्स पार्टीसाठी बुक करायचा, 6 फेब्रुवारीला देवा त्याचे सहकारी शोभित-मोहित यांच्यासोबत पाहुण्याकडे गेला. पुढे डान्सरने सांगितले की, आधी तिथे लोक उपस्थित होते, मला कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून प्यायला लावले गेले आणि माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला, त्यानंतर व्हिडिओ बनवला, आता व्हिडिओच्या मदतीने ते मला पार्टीला बोलावण्यासाठी ब्लॅकमेल करत आहेत. आरोपींनी माझा व्हिडिओही व्हायरल केल्याचे डान्सरचे म्हणणे आहे.
डान्सरच्या तक्रारीवरून डीसीपीने एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, डान्सरचे मेडिकल केले जात नाही, तरीही आम्ही एफआयआरच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहोत. एसीपी विशाल पांडे सांगतात की, महिलेच्या आरोपानुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि व्हिडिओ बनवण्यात आला, आरोपींचा शोध सुरू आहे.