लज्जास्पद! टॉफीचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 22:24 IST2021-09-06T22:23:44+5:302021-09-06T22:24:28+5:30

Rape on Minor : चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर १२ वर्षीय मुलाने दुष्कर्म करून मुलीला तिच्या घरी सोडले.

Shame! 4 year old girl sexually abused by showing the lure of toffee | लज्जास्पद! टॉफीचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

लज्जास्पद! टॉफीचे आमिष दाखवून ४ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

ठळक मुद्दे दरम्यान १२ वर्षाच्या मुलाने टॉफीचे आमिष दाखवून खेळत असलेल्या मुलीला अंगणातून घेऊन गेला.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात चार वर्षांच्या चिमुकलीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. 12 वर्षाच्या अल्पवयीनमुलाने हा बलात्कार केला.

हे प्रकरण धौलपूर जिल्ह्यातील सायपाऊ पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाचे आहे, जिथे 3 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा शेजाऱ्याने एका 4 वर्षीय चिमुकलीला टॉफीचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेऊन आपल्या खोलीत नेले. त्यानंतर चिमुकलीवर बलात्कार केला. यानंतर १२ वर्षीय मुलाने दुष्कर्म करून मुलीला तिच्या घरी सोडले.

जेव्हा चिमुकलीच्या आईने तिचे गुप्तांग गंभीर अवस्थेत पाहिले, तेव्हा ती स्तब्ध झाली आणि कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे त्यांना आपल्या मुलीशी काहीतरी चुकीचे घडले आहे, असे समजले.

टॉफीच्या आमिषाने बलात्कार केला

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा त्याची 4 वर्षांची मुलगी घरी खेळत होती. घरातील पुरुष शेतात काम करण्यासाठी बाहेर गेले होते आणि चिमुकलीचे आई घरगुती कामात व्यस्त होती. या दरम्यान १२ वर्षाच्या मुलाने टॉफीचे आमिष दाखवून खेळत असलेल्या मुलीला अंगणातून घेऊन गेला.

मुलगा मुलीला त्याच्या घरातील एका खोलीत घेऊन गेला जेथे दुष्कर्म केले गेले. त्यानंतर पीडित मुलीला तिच्याच घरी सोडले. आईने मुलीच्या गुप्तांगाची नाजूक स्थिती पाहिल्यावर तिला रुग्णालयात नेले.

सायपाऊ पोलीस स्टेशनचे एसएचओ परमजीत सिंह पटेल यांनी सांगितले की, विधिसंघर्ष बालक 12 वर्षांचा अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते. मुलीचे वैद्यकीय केले गेले आहे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

 

Web Title: Shame! 4 year old girl sexually abused by showing the lure of toffee