Shame! 3 year old girl was raped, Pocso case registered during lockdown pda | लज्जास्पद! लॉकडाऊनदरम्यान ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल 

लज्जास्पद! लॉकडाऊनदरम्यान ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल 

ठळक मुद्देराजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक 20 वर्षांच्या तरूणाने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुलीचा रक्तस्त्राव पहिला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांकडे जाऊन आरोपींविरूद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली.

जयपूर - देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती पसरलेली असताना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक 20 वर्षांच्या तरूणाने ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीचा लैंगिक छळ करून तिथून त्याने पळ काढला आहे. गुरुवारी संध्याकाळी हा गुन्हा घडला. 

 पीडित मुलीच्या आई-वडिलांना जबर धक्का 
पीडित ३ वर्षीय मुलीचे पालक शेतीवर काम करून सायंकाळी घरी परत आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. जेव्हा त्यांनी मुलीचा रक्तस्त्राव पहिला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांकडे जाऊन आरोपींविरूद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, गुरुवारी ३ वर्षीय मुलीचे पालक शेतात काम करण्यासाठी गेल्याने ती घरात एकटी होती. तिची एक काकू शेजारी राहते. संध्याकाळी, 20 वर्षीय आरोपी तिच्या घरी आला आणि तिच्याबरोबर खेळायला लागला. काही वेळाने त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिला रक्तस्त्राव झाल्याने तो तेथून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाचा तपास केला. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात  आली असून त्यातून बलात्कार झाल्याचे सिद्ध होईल. आरोपी रोहितांश जाटव हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.


अशीच घटना घडलेली 
अशाच एका घटनेत राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना एका वृद्ध व्यक्तीने केली आहे. या क्रूर कृत्यानंतर त्या व्यक्तीने तिच्या शाळेच्या ड्रेस ’बेल्टने मुलीचा गळा आवळून खून केला. गेल्या महिन्यात, आणखी एका अत्यंत दु: खद घटनेत चेन्नईत शेजार्‍याने शेजारच्या एका दोन मजली इमारतीच्या टेरेसवर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडवून आणली. दुसर्‍या मजल्यावर राहायचा आरोपी, रात्री पायऱ्यांजवळ असलेल्या वॉशरूमचा वापर करण्यासाठी मुलगी घराबाहेर पडल्यावर तिला जबरदस्तीने त्याच्या खोलीत नेले आणि बलात्कार केला होता. 

Web Title: Shame! 3 year old girl was raped, Pocso case registered during lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.