लज्जास्पद! १९ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करून फेकून दिला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:49 IST2020-05-01T20:44:47+5:302020-05-01T20:49:01+5:30

विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Shame! A 19-year-old girl was abducted, raped, murdered and her body dumped pda | लज्जास्पद! १९ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करून फेकून दिला मृतदेह 

लज्जास्पद! १९ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करून फेकून दिला मृतदेह 

ठळक मुद्देमुलीच्या वडिलांनी 28 एप्रिल (मंगळवार) रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.यासंदर्भात पोलिसांनी गावातील राजकिशोर यादव आणि संतोष यादव यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

देवघरच्या मोहनपूरमध्ये इंटर विद्यार्थिनीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीचा मृतदेह गावाच्या विहिरीतून सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. मुलीच्या वडिलांनी 28 एप्रिल (मंगळवार) रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी 1 मे (शुक्रवार) रोजी गावातील दोन तरुणांना अटक केली. दोन्ही आरोपींनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.



या खळबळजनक घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, 30 एप्रिल (गुरुवारी) रोजी 19 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह गावच्या विहिरीत सापडला. घटनेची संपूर्ण माहिती देताना देवघरचे एसपी पीयूष पांडे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी गावातीलच दोन तरुणांविरूद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गावातील राजकिशोर यादव आणि संतोष यादव यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकला 

विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडित तरुणीला डोक्याला जखम झाली, नंतर जवळच्या विहिरीत फेकले गेले. मोहनपूर पोलिस ठाण्यांतर्गत गेल्या एका वर्षात विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून केल्याची ही तिसरी घटना आहे. मृतदेह सापडल्यानंतर वडिलांनी दोन्ही तरुणांवर मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा आरोप केला. विद्यार्थिनीच्या पोस्टमार्टम अहवालात तिच्यावर प्रथम बलात्कार आणि नंतर तिचा खून झाल्याचे समोर आले आहे.

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

Web Title: Shame! A 19-year-old girl was abducted, raped, murdered and her body dumped pda