Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 02:30 PM2020-05-01T14:30:10+5:302020-05-01T14:36:51+5:30

Coronavirus : सीडीओच्या तपासणी अहवालानंतर डीएम यांनी ही कारवाई केली.

Coronavirus : Removed the officer who sent pornographic photos to the WhatsApp group pda | Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासंदर्भात लक्ष ठेवण्यासाठी डीएम मंगेश घिल्डियाल यांनी कोकिड -19 हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. गुरुवारी तपास अहवाल मिळाल्यानंतर डीएम यांनी ब्लॉक स्तरावरील अधिकारी आपल्या पदावरून काढून टाकले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील फोटो पोस्ट केल्याचा आरोपाखाली अधिकाऱ्याला हटविण्यात आले आहे. 

सीडीओच्या तपासणी अहवालानंतर डीएम यांनी ही कारवाई केली. आरोपी अधिकाऱ्यांकडे तीन दिवसांत स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासंदर्भात लक्ष ठेवण्यासाठी डीएम मंगेश घिल्डियाल यांनी कोकिड -19 हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये सीडीओ, डीडीओ, बीडीओ, सीएमओ, डीडीओ, सीबीओ, एसीओ आणि इतर जिल्हा व गटस्तरीय अधिकारी यांचा समावेश होता.

मंदिराच्या पुजाऱ्याला लाठी-काठीने बेदम मारहाण, कसाबसा वाचवला जीव

 

खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

 

CoronaVirus लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

डीएम देखील या ग्रुपमार्फत आवश्यक सूचना देत होते, परंतु गेल्या आठवड्यात या ग्रुपमध्ये ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्याने आपला अश्लील फोटो पाठवला. दुसर्‍या दिवशी सकाळी अधिकारी आपल्या मोबाईल फोटो पाहून थक्क झाले.


डीएम यांनी तपास सीडीओकडे सोपविला. गुरुवारी तपास अहवाल मिळाल्यानंतर डीएम यांनी ब्लॉक स्तरावरील अधिकारी आपल्या पदावरून काढून टाकले. स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. हे अधिकारी दोन महिन्यांनंतर निवृत्त होणार होते.

 

 

 

Web Title: Coronavirus : Removed the officer who sent pornographic photos to the WhatsApp group pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.