धक्कादायक! मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांचा संयम सुटला, आधी उचलले टोकाचे पाऊलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 10:28 IST2023-01-29T10:27:29+5:302023-01-29T10:28:24+5:30

उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांनी रागाच्या भरात मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

shahjahapur honor killing father killed daughter after seeing her with boy friend | धक्कादायक! मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांचा संयम सुटला, आधी उचलले टोकाचे पाऊलं अन्...

धक्कादायक! मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांचा संयम सुटला, आधी उचलले टोकाचे पाऊलं अन्...

उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांनी रागाच्या भरात मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे, यानंतर आरोपीने स्वत: पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली, या प्रकरणाचा उलघडा पोलीस तपासात झाला आहे.

ऑनर किलिंगची ही घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरची आहे. मुलीच्या ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. इंटर विद्यार्थिनीची हत्या अन्य कोणी नसून तिच्या वडिलांनी प्रेम प्रकरणातून केली.  मुलीचे गावातीलच मुलासोबत प्रेम होते, वडिलांनी मुलीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर मुलीच्या हत्येचा कट रचला. घरात नेऊन मुलीला मारहाण केली. यानंतर मृतदेह बांधून तिची सायकल, शाळेची दप्तर आणि कपडे घेऊन तलावात फेकून दिले. 

मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 24 जानेवारी रोजी तलावात मुलीचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. 24 जानेवारी रोजी सिधौलीतील दिउरिया भागात असलेल्या तलावात इंटर विद्यार्थ्याचा मृतदेह कापडात बांधलेला आढळून आला होता. तिची सायकल, स्कूल बॅग आणि कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बारकाईने तपास करत आरोपी वडील सुखलाल याला अटक केली.

सुखलालने पोलिसांसमोर या हत्येचा खुलासा केला आहे. या विद्यार्थिनीचे गावातील अवनीश या मुलावर प्रेम होते.  आपली मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत पाहून त्याने मुलीला घरी नेऊन समजावून सांगितले, मात्र तीने ऐकले नाही.यानंतर तिच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून तिची सायकल बॅग व कपडे घेऊन गावातील तलावात फेकून देण्यात आले,  आणि पोलिसांना त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून शाळेत प्रार्थनापत्र देण्यात आले. या खुनाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी सुकलाल याला अटक करून कारागृहात रवानगी केली.
 

Web Title: shahjahapur honor killing father killed daughter after seeing her with boy friend