मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

By मुरलीधर भवार | Published: January 28, 2023 05:52 PM2023-01-28T17:52:53+5:302023-01-28T17:55:00+5:30

गुटख्याने भरलेल्या २४ गाेण्या केल्या जप्त, तीन जणांना केली अटक

gutkha was being smuggled through ac of mail Express raid by kalyan railway police | मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

Next

कल्याण-मेल एक्सप्रेसच्या एसी बोगित सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा कल्याण रेल्वे पाेलिसांनी पर्दाफाश केला आहे. एसी बोगीत छापा टाकत गुटख्याचे भरलेल्या २४ गोण्या पाेलिसांनी जप्त केल्या आहे. या प्रकरणी तीन जणांना पाेलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे अली मुस्ताक मरहुम, कृष्णा गुप्ता आणि खेमराज प्रजापती अशी आहेत.

छपरा ते लोकमान्य टिळक टर्मिनस मेल एक्स्प्रेसमधील एसी बोगीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती कल्याण रेल्वे पाेलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मेल कल्याण रेल्वे स्थानकावर येताच कल्याण रेल्वे पाेलिसांच्या पथकाने एसी बाेगीत छापा मारला. बाेगीची तपासणी सुरू केली. यावेळी या बोगीत काही गोण्या संशयास्पद आढळून आल्या. 

पाेलिस पथकाने तत्काळ तपासणी केली असता गोण्यांमध्ये गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या गोण्या जप्त करत या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. अटक आराेपींपैकी यामधील कृष्णा गुप्ता हा हमाल आहे तर उर्वरित दोन आरोपी हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत .या तिघानी बिहार येथून मुंबईला हा गुटखा विक्रीसाठी आणला होता त्यांनी आधी काही असे प्रकार केले आहे का या अंगाेन रेल्वे पाेलिस तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gutkha was being smuggled through ac of mail Express raid by kalyan railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.