शाब्बास रुपाली! महिला पोलिसाने वाचविले गरोदर महिलेचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 14:24 IST2018-09-28T14:24:35+5:302018-09-28T14:24:54+5:30

पूजा चार महिन्यांची गर्भवती असून सध्या तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Shabas Rupali! Female police saved lives of pregnant woman | शाब्बास रुपाली! महिला पोलिसाने वाचविले गरोदर महिलेचे प्राण 

शाब्बास रुपाली! महिला पोलिसाने वाचविले गरोदर महिलेचे प्राण 

मुंबई - महिला पोलीस शिपाई रुपाली मेजारी यांनी लोकलमधून पडलेल्या गरोदर महिलेचे प्राण वाचवले आहे. प्रसंगावधान दाखवून लोकलमधून रुळावर पडलेल्या गरोदर पूजा नावाच्या महिलेला रुपाली यांनी वाचवलं आहे. त्यामुळे सगळेच रुपालीचं कौतुक करत आहेत. पूजा चार महिन्यांची गर्भवती असून सध्या तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बुधवारी जलद लोकलनं प्रवास करणारी पूजा नावाची महिला वांद्रे रेल्वे स्थानकदरम्यान चक्कर येऊन लोकलमधून खाली कोसळली. त्यावेळी त्याच लोकलमधून महिला पोलिस शिपाई रुपाली मेजारी या देखील प्रवास करत होत्या. पूजा रुळावर पडल्याचं कळताच लोकलमधून उतरून त्या धावत बाजूच्या रुळावर पोहोचल्या आणि क्षणात पूजाला रुळावरून सुरक्षित बाजूला करून त्यांनी रेल्वेपोलिसांना फोन करून मदतीसाठी बोलावलं. रुपाली यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेनं पूजाचे प्राण वाचले. 

Web Title: Shabas Rupali! Female police saved lives of pregnant woman