मार्केटयार्ड येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:27 IST2019-08-29T11:24:26+5:302019-08-29T11:27:00+5:30

मार्केटयार्ड येथील वास्तूश्री कॉम्प्लेक्समध्ये थाय स्पा या नावाने मसाज सेंटर चालविले जात आहे...

sex racket open who started under name of spa business at Marketyard; Owner arrested | मार्केटयार्ड येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; मालकाला अटक

मार्केटयार्ड येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; मालकाला अटक

पुणे : स्पा च्या नावाखाली मार्केटयार्ड येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी स्पा मालक राहूल झांबरे याला अटक करण्यात आली आहे. 
मार्केटयार्ड येथील वास्तूश्री कॉम्प्लेक्समध्ये थाय स्पा या नावाने मसाज सेंटर चालविले जात आहे. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केल्यानंतर त्यांनी छापा घातला. या ठिकाणी स्पा मॅनेजर म्हणून एक तरुणी काम पाहात होती. या ठिकाणी ४ महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. त्यापैकी २ थायलंँड तसेच पश्चिम बंगाल, मिझोराम येथील प्रत्येकी एक महिला आहे. पोलिसांनी राहुल झांबरे याला अटक केली असून पिटा कायद्यांतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: sex racket open who started under name of spa business at Marketyard; Owner arrested