१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:48 IST2025-08-11T09:47:39+5:302025-08-11T09:48:42+5:30

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too | १२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा एक अत्यंत भयानक आणि कुणालाही हादरवून टाकेल, असा प्रकार समोर आला आहे. येथील नालासोपारा भागातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. दरम्यान एका १२ वर्षांच्या चिमुकलीचे रेस्क्यू करण्यात आले. तिच्यासोबत जे काही घडले, ते अत्यंत भयंकर आणि संतापजनक आहे. आपल्यासोबत, तीन महिन्यांत २०० हून अधिक जणांनी वाईट कृत्य केले, असे या चिमुकलीने म्हटले आहे. ही चिकमुकली मुळची बांगलादेशातील आहे. २६ जुलैला या नरकातून तिची सुटका करण्यात आली. सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. j

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

गुजरातमधील नाडियाडमध्ये ठेवलं गेलं -
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले, रिमांड होममध्ये संबंधित चिमुकलीचे समुपदेशन (Counselling) करण्यात आले. यानंतर या चिमुकलीने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिने सांगितले की, तिला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले. तेथे तीन महिने ठेवण्यात आले. या काळात तिच्यासोबत २०० हून अधिक जणांनी वाईट कृत्य केले.

नापास झाल्यानंतर आई-वडिलांच्या धाकाने घरातून पळाली -
अब्राहम मथाई यांनी सांगितले की, "ही चिमुकली शाळेत शिकत होती. ती एका विषयात नापास झाली. यामुळे आई-वडील मारतील, या भीतीमुळे तिने घर सोडले आणि ती कशी तरी बांगलादेशहून भारतात आली. येथे तिला काही लोकांनी मदतीचे आमिष दाखवू वेश्याव्यवसायात ढकलले." दरम्यान आता, मथाई यांनी पोलिसांकडे मुलीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या २०० जणांना अटक करण्याची मागणी केली आहे.

प्रत्येत रेस्क्यूची हीच कथा! - 
यासंदर्भात बोलताना पोलिस आयुक्त निकेत कौशिक म्हणाले, पोलिस संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत. याच वेळी, मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे कामही केले जात आहे. मथाई म्हणाले, ही एकमेव मुलगी आहे, असे नाही. जेव्हा-जेव्हा असे बचाव कार्य होते, तेव्हा-तेव्हा अशी एक तरी मुलगी नक्की सापडते. जेव्हा मुली एकट्या असतात तेव्हा लोक मदतीच्या नावाने त्यांची फसवणूक करतात.

Web Title: Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.