शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्याची सुटका, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 07:25 IST

मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत शहापूर परिसरातून केली सुखरूप सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्याची मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासांत शहापूर परिसरातून सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली. या अपहरण प्रकरणातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. महत्त्वाचे म्हणजे शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालकानेच हा अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. विरेन पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

डोंबिवली पूर्वेकडील रिजेन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा खासगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य (वय ७) सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी नेहमीच्या रिक्षातून निघाला. सकाळी नऊच्या सुमारास रिक्षाचालक विरेन पाटील याच्या मोबाइलवरून महेश यांना व्हॉटसॲप कॉल आला. एका अनोळखी व्यक्तीने त्यावर संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षाचालकासह अपहरण केले आहे, दोन कोटी रुपये द्यावे लागतील, पोलिसांना कळविल्यास दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. महेश यांची पत्नी कोमल हिने मानपाडा पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसानी पथके नेमली.

पोलिसांचा संशय बळावला

महत्त्वाचे म्हणजे मुलाला शाळेत ने-आण विरेन आणि त्याचा भाऊ करायचा. सलग येणारा विरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही. विरेनच्या मोबाइलवरून व्हॉटसॲप कॉल करून खंडणी मागितली जात असल्याने पोलिसांचा विरेनवर संशय बळावला. विरेनच्या भावालाही चौकशीकामी आणले होते. दरम्यान, संबंधित मोबाइल ट्रेस करत पोलिसांची पथके शहापूर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तिचा शोध घेत कैवल्यची साडेतीन तासांत सुटका केली. विरेन यानेच अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले.

आणखी आरोपी?

चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरणExtortionखंडणी