शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

लॉकडाऊनदरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सात नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:09 IST

झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील गोपीकंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देआता या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक करण्यात आले आहे.सात आरोपींपैकी दोनजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.crim

रांची - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांत लॉकडाऊन करण्यात आल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे. त्याचा फायदा काही नराधमांनी घेतला. झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील गोपीकंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हाही दाखल केला. आता या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक करण्यात आले आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पोलिसांनी आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सात आरोपींपैकी दोनजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.झारखंडमधल्या दुमका शहरातील शिवपहार येथे भाड्याच्या घरात ही पीडित अल्पवयीन मुलगी राहत असून, एसपी महाविद्यालयात शिकते. लॉकडाऊन झाल्याने महाविद्यालय बंद करण्यात आलं होतं. रस्त्यांवर वाहनांनी वर्दळही बंद होती. २४ मार्चला ती एका मैत्रिणीसह घरी परतत असताना गावच्या वेशीवर सोडून मैत्रीण निघून गेली. सोबतीसाठी तिने आपल्या घरातील सदस्यांना त्या ठिकाणी बोलावले होते. संध्याकाळपर्यंत कुटुंब न आल्यानं तरुणीनं गावातील मित्र विक्की उर्फ प्रसन्नजित हंसदा याला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले.  हा तरुण त्याचा गावातील रहिवासी असल्यानं लागलीच मित्रासोबत दुचाकीसह तरुणी उभी असलेल्या वळणावर पोहोचला.विकीने घरी जाण्याऐवजी दुसऱ्या वाटेवरून दुचाकी घेतली. जेव्हा पीडितेनं विकीला हा घरी जाण्याचा मार्ग नाही ,असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला की, रस्त्यावर तपासणी सुरू आहे म्हणून आम्ही कच्च्या रस्त्यावरून घरी जात आहोत. काही अंतर गेल्यानंतर विकीने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबविली आणि शौचालयाला जातो, असं सांगितलं. पीडिता विकीच्या अज्ञात मित्रासह बराच काळ निर्जन जंगलात उभी होती. त्यानंतर विक्कीने मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर आठ तरुण तोंडाला कपडा बांधून आले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत गळ्यावर चाकू धरला होता. त्या आठ जणांनी तरुणीवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्रभर जंगलात बेशुद्धावस्थेत सोडून ते नराधम तिथून पसार झाले होते. दुसर्‍या दिवशी २५ मार्चला सकाळी ती जंगलातून कशीबशी रस्त्यावर आली, तेव्हा गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि कुटुंबीयांना माहिती दिली. प्रसंगी आई, वडील आणि भाऊ आले आणि तिला उचलून घरी घेऊन गेले होते. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पीडितेवर नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसGang Rapeसामूहिक बलात्कारJharkhandझारखंड