Nashik Accident: नाशिकमध्ये अपघातांची मालिका; स्कोडा कारवर कंटेनर आदळला, चार मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:27 PM2021-07-21T23:27:07+5:302021-07-21T23:27:32+5:30

Nashik Accident news: बकरी ईदचा सण आटोपून बुधवारी सकाळी जुने नाशिक, वडाळारोड या भागातील चौघे तरुण स्कोडा कारने इगतपुरी भागात पर्यटनासाठी गेले होते.

Series of accidents in Nashik; container collided with a Skoda car, four friends killed | Nashik Accident: नाशिकमध्ये अपघातांची मालिका; स्कोडा कारवर कंटेनर आदळला, चार मित्रांचा मृत्यू

Nashik Accident: नाशिकमध्ये अपघातांची मालिका; स्कोडा कारवर कंटेनर आदळला, चार मित्रांचा मृत्यू

googlenewsNext

नाशिक : पावसाळी पर्यटन आटोपून जुन्या नाशकातील पाच मित्र स्कोडा मोटारीने बुधवारी (दि. २१) इगतपुरीकडून नाशिककडे परतत होते. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारात त्यांच्या मोटारीवर मुंबईकडे जाणारा कंटेनर दुभाजक तोडून यांच्या मोटारीवर येऊन आदळला. दुर्घटना इतकी भीषण होती की कारचा संपूर्णत: चक्काचूर होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. या घटनेने संपूर्ण जुने नाशिक भागातील मुस्लीम समुदायात शोककळा पसरली.

बकरी ईदचा सण आटोपून बुधवारी सकाळी जुने नाशिक, वडाळारोड या भागातील चौघे तरुण स्कोडा कारने इगतपुरी भागात पर्यटनासाठी गेले होते. तेथून नाशिककडे परतीचा प्रवासात असताना वाडीवऱ्हे शिवारात त्यांच्या मोटारीवर नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर (एनएल ०१ अेअे. १२४८) थेट दुभाजक तोडून नाशिक लेनवरून जाणाऱ्या स्कोडावर येऊन आदळला. या अपघातात कारमधील पाच युवक पूर्णत: दाबले जाऊन गंभीररीत्या जखमी झाले.

घटनास्थळी आपत्कालीन मदत पोहोचेपर्यंत चौघा तरुणांनी आपले प्राण सोडले होते. एका तरुणाला गंभीर अवस्थेत कारचा पत्रा कापून पोलिसांनी बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित चव्हाण हे पथकाला घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका व महामार्ग् प्राधिकरणाला माहिती देत अतिरिक्त मदत पाचारण केली. दुर्घटना इतकी भीषण होती की कारचा अक्षरक्ष: भुगा झाला. कंटेनरची बॉडी ही पुर्णत: ट्रेलरवरुन सुटून वाऱ्यासारखी रस्त्यावर फेकली गेल्याने त्याच्या जबर धक्क्याने कारही रस्त्यावरुन बाजूला वेगाने जाऊन उलटली आणि लोखंडी पत्र्याची बॉडीखाली कार दाबली गेली. क्रेनच्या सहाय्याने हा लोखंडी मालवाहु डबा उचलून कारमधील युवकांना बाहेर काढण्यात आले. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. चौघांचे मृतदेह आणि नबील रऊफ सय्यद (२१) या तरुणाला अत्यवस्थ अवस्थेत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनर चालक, क्लिनर घटनास्थळावरुन फरार झाले असून त्यांचा पोलीस शाेध घेत आहेत. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
 

यांचा झाला मृत्यू
रिजवान इकबाल कुरेशी (३०,रा.चौकमंडई, जुने नाशिक), जुबेर इकबाल शेख (३२,रा. अशोकामार्ग), हुजेफा उर्फ सोनु एजाज उस्मानी (२८,रा. भाभानगर, वडाळारोड), सोहेल अकील पठाण (२९,रा.विनयनगर)

Web Title: Series of accidents in Nashik; container collided with a Skoda car, four friends killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.