महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:31 PM2021-05-12T21:31:51+5:302021-05-12T21:32:30+5:30

Crime News : या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

Sent obscene photos of having sexual relations with a woman to her relatives ... | महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्... 

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्... 

Next
ठळक मुद्दे आरोपी तरुणाच्या त्रासाला कंटाळून पीडितेने कळमनुरी पोलीस ठाण्यात पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असणाऱ्या सागर सुनील मोरे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोलीच्या पुण्यात कामानिमित्त आलेल्या महिलेचे तरुणाने अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. एकाच कंपनीत सोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून समाजात बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे तिच्या संमतीशिवाय अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची समाजात अब्रूचे धिंडवडे काढण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात राहणारी एक महिला काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबीयांसोबत पुण्यात कामानिमित्त आली होती. दरम्यानच्या काळात पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना तिची ओळख कंपनीत काम करणाऱ्या सागर सुनील मोरे नावाच्या तरुणाशी झाली. याच ओळखीतून त्यांची मैत्री वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. नंतर आरोपी तरुणाने पीडित महिलेशी शारीरिक संबंधही ठेवले आणि तिच्या परवानगीशिवाय तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.

आरोपी सागर मोरे याने नंतर महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली आहे. आरोपी तरुणाच्या त्रासाला कंटाळून पीडितेने कळमनुरी पोलीस ठाण्यात पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असणाऱ्या सागर सुनील मोरे नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपी तरुणाला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Sent obscene photos of having sexual relations with a woman to her relatives ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app