Sensational! Woman died in a lift in a Naval colony | खळबळजनक! नेव्हल कॉलनीत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

खळबळजनक! नेव्हल कॉलनीत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देया अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास कफ परेड पोलीस आणि नौदल अधिकाऱ्यांद्वारे सुरू आहे.

मुंबई - आज दुपारच्या सुमारास कुलाबातील नौदल निवासी कॉलनीत घरकाम करणाऱ्या महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. आरती दशरत परदेशी (४५) असं या मृत महिलेचं नाव आहे. नौदल निवासी कॉलनीतील एका बहुमजली इमारतीच्या दोन मजल्यांमधील लिफ्टच्या शाफ्टमध्ये अचानक अडकली आणि या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आज दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास विजया अपार्टमेंट, आर. सी. चर्च, नोफ्रा, कुलाबा या ठिकाणी आरती दशरथ परदेशी या तिसऱ्या मजल्यावरून पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जात असताना त्यांचा पाय आणि शरीर लिफ्ट आणि भिंत यामध्ये अडकल्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले.
आपत्कालीन सेवांकरिता तात्काळ पाचारण करण्यात आले आणि पोलिसांच्या उपस्थितीत लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास कफ परेड पोलीस आणि नौदल अधिकाऱ्यांद्वारे सुरू आहे.

Web Title: Sensational! Woman died in a lift in a Naval colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.