खळबळजनक! मुख्याध्यापकाकडून दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:38 IST2020-02-11T19:34:11+5:302020-02-11T19:38:49+5:30

आरोपी अटक : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sensational! Sexual harrasement to two minor girls by the headmaster | खळबळजनक! मुख्याध्यापकाकडून दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

खळबळजनक! मुख्याध्यापकाकडून दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देया प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.एका प्रकरणात कलम ३७६ (अ), (ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदी (रेल्वे)( वर्धा) : जिल्हा परिषदेतील शाळेतील एका मुख्याध्यापकाने शाळेतीलच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसा येथे घडली.

जि.प.च्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. सदर प्रकार पीडितांनी आईला सांगितला असता पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपीकडून हा घृणास्पद प्रकार सुमारे तीन महिन्यांपासून सुरू होता असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपी नराधम शिक्षकांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात कलम ३७६ (अ), (ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरच्यांना सांगितल्यानंतर प्रकरण उजेडात
हिंगणघाट येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असताना ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी शिक्षक सतीश केशव बजाईत याने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याला अटक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यापासून शिक्षकाचा हा मनमर्जी प्रकार सुरू होता. पीडित मुलींनी घरच्यांना सांगितल्यावर त्यावरून पडदा उठला, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sensational! Sexual harrasement to two minor girls by the headmaster