खळबळजनक! प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:55 IST2019-07-30T18:53:44+5:302019-07-30T18:55:21+5:30

ट्विटरवर केलेल्या तक्रारीची मुंबई पोलीस घेतली दखल 

Sensational! Police arrested auto rickshaw driver who was masturbating in front of traveller woman | खळबळजनक! प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खळबळजनक! प्रवासी महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देमहिला प्रवासी प्रवास करत असताना तिच्यासमोर आरश्यात पाहून हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षाचालकास अटक केली आहे.  याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - मुंबईपोलिसांनी आलेल्या एका ट्विटची दाखल घेत याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्याशी बोलून योग्य तो समन्व्य साधला. कमीत कमी वेळात कांदिवली पोलिसांनी रात्रीच्या वेळेस महिला प्रवासी प्रवास करत असताना तिच्यासमोर आरश्यात पाहून हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षाचालकास अटक केली आहे. 

काल सोमवारी रात्री १०.५० ते ११ वाजताच्यादरम्यान २० वर्षीय तरुणी कांदिवली रेल्वे स्टेशन ते डहाणूकरवाडी असा रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षा चालक हा त्या तरुणीकडे  पाहून रिक्षेच्या पुढच्या आरश्यात बघत हस्तमैथुन करू लागला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने मध्येच रिक्षा थांबून रिक्षाचं भाडं देऊन निघून गेली. तरी देखील रिक्षाचालक मोकाट फिरत होता. याबाबत तरुणीच्या मित्राने ट्विटरवर माहिती दिली आणि मुंबई पोलिसांना टॅग केली. याची तात्काळ दखल घेत मुंबई पोलिसांनी ट्विटरवर रिप्लाय दिला आणि योग्य तो समन्व्य साधून रीतसर कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर झोपटपट्टीतून ३३ वर्षीय आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Sensational! Police arrested auto rickshaw driver who was masturbating in front of traveller woman