'जमीन विकून मला पैसे नाहीतर तुकडे करून...', पत्नीचे तरुणासोबत प्रेमसंबंध, धमकीनंतर पतीचे एसपींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:06 IST2025-04-12T17:04:24+5:302025-04-12T17:06:55+5:30
Wife Threatening Husband: मेरठमधील सौरभ सारखीच हत्या करण्याची धमकी पत्नी पतीला दिली. पतीचे तीन वर्षांपासून तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे पतीने पोलीस अधीक्षकांना सांगितले.

'जमीन विकून मला पैसे नाहीतर तुकडे करून...', पत्नीचे तरुणासोबत प्रेमसंबंध, धमकीनंतर पतीचे एसपींना पत्र
Wife Husband News: 'पत्नीचे तीन वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. तो घरातही आला होता. त्या दोघांना रंगेहाथ पकडले. पण, पत्नी त्यांच्यासोबत प्रेमसंबंध संपवत नाहीये. मलाच आता धमक्या देऊ लागली आहे. जमीन विकून मला पैसे दे, नाहीतर तुझे तुकडे करून ड्रममध्ये भरेन, अशी धमकी देत आहे.' ही तक्रार आहे एका ४२ वर्षीय व्यक्तीची. पत्नीच्या धमकीनंतर पतीने थेट पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४२ वर्षीय व्यक्तीने बांदाचे पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल यांना पत्र लिहून त्याची व्यथा सांगितली आहे.
वाचा >>‘ती राहुलसोबत पाच दिवस...’, जावयासह पळून गेलेल्या महिलेच्या पतीचा धक्कादायक खुलासा
तरुण रात्री घरात घुसला
पीडित पतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नीचे तीन वर्षांपासून औरेया जिल्ह्यातील एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. एका रात्री तो तरुण घरात घुसला होता. आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, पत्नी त्यांच्यासोबतचे संबंध तोडण्यास तयार नाहीये.
पत्नीने छातीवर काढला प्रियकराच्या नावाचा टॅटू
पतीने तक्रारीत म्हटले आहे की, पत्नीने प्रियकराच्या नावाचा टॅटूही छातीवर काढला आहे. ती घरातील दागिने विकतेय आणि प्रियकराला खर्चासाठी पैसे देतेय. हल्ली न सांगताच घरातून निघून जाते आणि काही दिवस येत नाही.
तुकडे करण्याची धमकी
पत्नी इतक्यावरच थांबली नाहीये, तर ती मला आता हत्या करण्याची धमकी देत आहे. जमीन विकून मला पैसे दे. नाहीतर प्रियकराला बोलवून घेईन आणि तुझे तुकडे करेन. नंतर ड्रममध्ये भरेन आणि फेकून देईन, अशी धमकी पत्नी देत आहे.
याबद्दल पोलीस अधीक्षक अंकुर अग्रवाल म्हणाले की, पीडित पतीचे पत्र मिळाले आहे. कौटुंबिक वाद असल्याने गिरवा येथील पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी करण्याची आदेश दिले आहेत.