Seize foreign alcohol; Four arrested; Anti-Robbery Squad taken Action | विदेशी मद्य जप्त; चौघांना अटक; अँटी रॉबरी स्कॉडची कारवाई
विदेशी मद्य जप्त; चौघांना अटक; अँटी रॉबरी स्कॉडची कारवाई

ठळक मुद्दे एका रिक्षेतून सुमारे ४८ हजार रुपये किमंतीची हि दारु घेऊन जाणाऱ्या चौकडीला अटक करण्यात करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

कल्याण - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या अँटी रॉबरी स्कॉडने मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त केले. एका रिक्षेतून सुमारे ४८ हजार रुपये किमंतीची हि दारु घेऊन जाणाऱ्या चौकडीला अटक करण्यात करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॉबरी स्कॉड विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने परिमंडळ ३ हददीतील अवैध्य हातभटटी दारु, अमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्य तसेच तडीपार, रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई करत होती. गस्ती दरम्यान विनापरवाना दारुची वाहतुक होत असल्याची पाहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने मोहने रोड परिसरात मंगळवारी दुपारी सापळा लावला. यावेळी, एका रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ४८ हजार रुपये किमतीची विदेशी दारु आढळून आली.

याप्रकरणी रिक्षाचालक सचिन भालेराव (२८) याच्यासह दिलीप गजघाट (५१), अनिल पवार (३५) आणि कृष्णा यादव (४८, सर्व रा. गोळेगाव) या चौघांवर अँटी रॉबरी स्कॉडने कारवाई करीत सर्वांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.


Web Title: Seize foreign alcohol; Four arrested; Anti-Robbery Squad taken Action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.