रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 17:10 IST2021-06-28T17:05:57+5:302021-06-28T17:10:36+5:30

Murder Case : "पोलिसांना दिलेल्या जबाबात संतोषने सांगितले की, २०११ मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता आणि त्याने एका मुलीशी मैत्री केली होती.

Seeing him flirting with his girlfriend in the field in night, the boyfriend murder him; After 10 years, the murder was solved | रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा

रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा

ठळक मुद्दे संतोष यादव उर्फ ​​घनश्याम (३०) आणि त्याचा साथीदार लोकेश यादव (वय ३२) अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक केली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) तारकेश्वर पटेल यांनी रविवारी दिली.

रायपूर - छत्तीसगडमध्ये दहा वर्ष जुन्या खुनाचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे. २०११ मध्ये आरोपींनी आपल्या प्रेयसीला रायपूरमध्ये ठार मारल्याचे सांगितले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. संतोष यादव उर्फ ​​घनश्याम (३०) आणि त्याचा साथीदार लोकेश यादव (वय ३२) अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक केली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) तारकेश्वर पटेल यांनी रविवारी दिली.

आरोपीने मित्राला हत्येची बाब सांगितली

पोलीस म्हणाले की, रायपूरच्या कोसरंगी या गावी राहणारा लेखराम सेन (४०) याची जानेवारी २०११ मध्ये जिल्ह्यातील फरहादा गावात हत्या करण्यात आली होती. सन २०११ मध्ये सेनची हत्या केल्याचे संतोष यादव याने  फरहादा गावात एका ढाब्यावर आपल्या मित्राला सांगितले होते. पुढे त्याने सांगितले की, यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली होती.

हत्या केल्यानंतर मृतदेह धान्याच्या शेतात फेकला गेला

चौकशी दरम्यान संतोष यादव याने पोलिसांना सांगितले की, त्याने लोकेश यादवच्या मदतीने जानेवारी २०११ मध्ये सेनचा गळा आवळून खून केला होता आणि त्याचा मृतदेह फरहादा गावात धान शेतात टाकला होता.

प्रियकरासोबत मुलीला पाहून सेनने तिच्या कुटुंबियांना सांगण्याची धमकी दिली

"पोलिसांना दिलेल्या जबाबात संतोषने सांगितले की, २०११ मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता आणि त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. रात्री उशिरा खेड्यात धान्याच्या शेतात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तो गेला. सेनने मैत्रिणीला तिच्या प्रियकरासोबत पाहिले आणि त्यांना त्यांच्या संबंधाबद्दल ग्रामस्थांना सांगण्याची धमकी दिली. नंतर संतोषने लोकेशच्या मदतीने सेनला त्याच्या पट्ट्याने गळा आवळून ठार मारले. 

Web Title: Seeing him flirting with his girlfriend in the field in night, the boyfriend murder him; After 10 years, the murder was solved