शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:14 IST

Sikkim Honeymoon Couple Missing: गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

UPCoupleMissing: हनीमूनसाठी सिक्कीमला गेलेल्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका कपलची कार सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही. सध्या तीस्ता नदी आणि दरीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. दुसरीकडे या घटनेमुळे कुटुंबात खळबळ उडाली आहे. त्यांनी सरकार आणि प्रशासनाला मुलगा आणि सुनेचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुसळधार पावसात प्रतापगड जिल्ह्यातील एका नवविवाहित कपलची कार तीस्ता नदीत पडल्याने ते बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. ही घटना २९ मे रोजी सिक्कीममधील लाचेनहून लाचुंगला परतत असताना घडली. या कपलसह आणि त्यांच्या ड्रायव्हरसह एकूण नऊ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

कौशलेंद्र प्रताप सिंह (२९) हा प्रतापगडचा रहिवासी असून तो भाजपा नेते उम्मेद सिंह यांचा भाचा आहे. कौशलेंद्र याने ५ मे रोजी धनगड सराई चिवलाहा गावातील विजय सिंह डब्बू यांची मुलगी अंकिता सिंह (२६) हिच्याशी लग्न केलं. कौशलेंद्र यांचे काका दिनेश सिंह यांच्या मते, हे कपल २५ मे रोजी ट्रेनने सिक्कीमला रवाना झालं आणि २६ मे रोजी मंगन जिल्ह्यात पोहोचलं.

२९ मे रोजी लाचेनहून परतत असताना, मुसळधार पावसात त्यांची कार नदीत कोसळल्याची माहिती आहे. नवविवाहित कपलव्यतिरिक्त, स्थानिक ड्रायव्हरसह वाहनात इतर सात पर्यटक होते - उत्तर प्रदेशचे दोन, त्रिपुराचे दोन आणि ओडिशाचे चार. ते सर्व अजूनही बेपत्ता आहेत.

कौशलेंद्र याचे वडील शेर बहादूर, अंकिताचा भाऊ आणि काका यांच्यासह कुटुंबातील सात सदस्य सिक्कीमला पोहोचले होते. त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मुलगा आणि सुनेचा शोध घेण्याचे आवाहन केलं. कुटुंबाने सिक्कीम आणि राज्य सरकारकडे या कपलचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नAccidentअपघातPoliceपोलिसsikkimसिक्किम