शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज; डोंबिवलीच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:01 IST

डोंबिवलीत एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

डोंबिवली : डोंबिवलीत एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. शाळेतील ट्रस्टीचा मुलगा एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून शारिरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणात मनसेने शाळेत जाऊन प्रचंड गोंधळ घातला. त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी जोरदार मागणी केली.

अखेर मानपाडा पोलीस शाळेत दाखल झाले. पोलिसांनी ट्रस्टचा मुलगा सरवना अय्यर याला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने सहावीच्या मुलीसोबत असा प्रकार केला असल्याचे पीडित शिक्षिकेने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. शाळेच्या ट्रस्टीने स्पष्ट सांगितले आहे की, माझ्या मुलाने असा प्रकार केला असल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे.

डाेंबिवली सागांव परिसरात जय भारत हायस्कूल ही शाळा आहे. या शाळेचे ट्रस्ट शिवा अय्यर आहेत. शिवा आय्यर यांचा मुलगा सरवना याच्यावर शाळेतील शिक्षिकेने गंभीर आरोप केला आहे. शिक्षिकेच्या मुलीला सरवना अय्यर याने अश्लील मेसेज पाठविला. अश्लील व्हिडीओ पाठवून तिने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवावे अशी मागणी करीत होता असा आरोप शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेसह तिच्या आईने मनसेकडे तक्रार केली.

हा प्रकार कळताच मनसेचे पदाधिकारी राहूल कामत, अरुण जांभळे, मनसेच्या महिला पदाधिकारी कोमल पाटील यांनी थेट शाळेत धाव घेतली. शाळेत शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी मनसेने मुलाला कुठे लवपून ठेवला आहे. त्याला आमच्या दाब्यात द्या अन्यथा मनसे स्टाईलने त्याला शिक्षा देऊ अशी जोरदार मागणी केली. जवळपास एक तास शाळेत मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. अखेरी हा प्रकार कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी स्वत: मनसे पदाधिकाऱ्यांना  शाळेतून बाहेर काढत ट्रस्टी शिवा यांच्याकडे त्यांच्या मुलाविषयी विचारणा केली. त्यावेळी शिवा यांनी पोलिसांना शाळेच्या शेजारी असलेल्या त्यांच्या घरी नेले. पोलिसांनी शिवा यांच्या घरातून त्यांचा मुलगा सरवना याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेले आहे. पोलीस ठाण्यात शिक्षिका, तिची आई, मनसे पदाधिकारी पोहचले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे. शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी सांगितलं की, माझ्या मुलावर जो गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तो दोषी असल्यास त्याला शिक्षा द्यावी.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSchoolशाळाStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीTeachers Councilशिक्षक परिषद