गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 20:55 IST2020-05-04T20:54:11+5:302020-05-04T20:55:54+5:30
ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा आहे. लोकही कारवाईची मागणी करत आहेत.

गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक
सोशल मीडियावर इन्स्टाग्राम चॅट जोरदार व्हायरल होत आहे. या गप्पांमध्ये काही शाळकरी मुले बलात्काराची योजना आखत असल्याचे दिसून आले आहे. ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा आहे. लोकही कारवाईची मागणी करत आहेत.
वास्तविक, 'बॉईज लॉकर रूम' नावाच्या या ग्रुपमध्ये काही शाळकरी मुले बोलत आहेत. हे एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या ट्विटने आश्चर्यचकित केले आहे. यात एक मुलगा मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यासाठी इतरांना भडकवत आहे.
ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर लीक झाले आहेत. त्यावर मुलींनी पोस्ट देखील लिहिले आहेत. काही इन्स्टाग्राम युजर्सनी स्क्रीनशॉट्स अपलोडही केले आहेत. स्क्रीनशॉट्स शेअर करणाऱ्या मुलींचा सूड कसा घ्यावा हे या मुलांनी ठरवले होते.
लोकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरोधात कारवाई करण्याची मागणी सुरू केली आहे आणि ट्विटरवर #boislockerroom ट्रेंड होत आहे. ते थांबवून कडक कारवाई करण्याची मागणी लोक करीत आहेत. असे सांगितले जात आहे की, बहुतेक मुले दक्षिण दिल्लीचे आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन करीत आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.