चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य

By दत्ता यादव | Updated: August 9, 2022 22:37 IST2022-08-09T22:31:06+5:302022-08-09T22:37:47+5:30

सातारा जिल्ह्यातील घटना, एकावर गुन्हा दाखल

Satara Crime News Indecent act with a three year old girl by luring her with chocolates | चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य

चाॅकलेट देण्याचं आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: एका तीन वर्षांच्या चिमुकलीला चाॅकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात समोर आली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एका इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद अंकुश लोखंडे (वय ४०, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसम प्रमोद लोखंडे हा एका गावामध्ये घरगडी म्हणून काम करत आहे. ८ ऑगस्टला सकाळी नऊच्या सुमारास पीडित चिमुकली खेळत असताना त्याने तिला चाॅकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाने धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती.

Web Title: Satara Crime News Indecent act with a three year old girl by luring her with chocolates