शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

नागपुरात आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला सेल्स मॅनेजरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:22 PM

राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या गल्लीमध्ये सोमवारी रात्री खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन भावांना अटक केली आहे.मृत विजय रमेश खंडाईत हा विजय क्रॉप्स प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता.

ठळक मुद्देराजाबाक्षा येथील घटना : आरोपी तिन्ही चव्हाण बंधू अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या गल्लीमध्ये सोमवारी रात्री खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन भावांना अटक केली आहे. आरोपींचे नाव यशवंत सीताराम चव्हाण (४७), संजय सीताराम चव्हाण (४४) व दिनेश सीताराम चव्हाण (५१)आहे. मृत विजय रमेश खंडाईत हा विजय क्रॉप्स प्रा. लि. कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. विजय आणि आरोपी यशवंत यांची मैत्री होती. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.सूत्राच्या मते सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विजय आपल्या कारने यशवंत चव्हाण याच्यासोबत राजाबाक्षा मंदिराजवळ पोहचला. तिथे आरोपी संजय व दिनेश उपस्थित होते. तिथे आरोपींचा विजय याच्याशी संपत्तीवरून वाद झाला. तिघांनीही मिळून विजयच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून त्याला जागेवर संपविले. त्यानंतर यशवंत चव्हाण हाताला चाकू लागल्याने स्वत:च मेडिकलमध्ये भरती झाला. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनीच विजयला त्याच्या गाडीमध्ये मेडिकलमध्ये आणले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र सुरुवातीला चर्चा होती की विजय व यशवंत याच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीत चव्हाण बंधूचा हत्येत सहभाग असल्याची माहिती मिळाली. इमामवाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी सर्व आरोपींना अटक केली. यशवंत व अन्य आरोपी विजयच्या हत्येमागचे नेमके कारण सांगू शकले नाही. परंतु दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण असल्याची माहिती पोलिसांना आहे.कुटुंबही अनभिज्ञविजय खंडाईत याचे कुटुंब मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील आहे. दोन वर्षापूर्वी विजयचा विवाह झाला होता. कुटुंबातील लोकही विजयला कुठल्या कारणांनी मारले याबद्दल अनभिज्ञ आहे. आरोपींनीही या प्रकरणात कुठलाही खुलासा केला नाही.२२ पर्यंत पीसीआरआरोपी तिन्ही चव्हाण बंधूला पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयापुढे सादर केले. न्यायालयाने आरोपींना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातूनच या घटनेचे नेमके कारण पुढे येऊ शकते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून